सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने उमेदवार निवडीची प्रक्रिया सक्रिय केली आहे. या अनुषंगाने काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी इच्छुक उमेदवारांशी तसेच ज्येष्ठ नेतेमंडळींशी सविस्तर संवाद साधला.
काँग्रेसच्या या बैठकीदरम्यान पक्षनिष्ठा, जनतेशी असलेला थेट संपर्क, सामाजिक कार्याचा अनुभव आणि स्थानिक प्रश्नांची जाण या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. इच्छुक उमेदवारांनी शहराच्या सर्वांगीण विकासाबाबत आपल्या अपेक्षा, कार्यपद्धती आणि भूमिका स्पष्ट केल्या.
नागरी सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, आरोग्य सेवा, शिक्षण तसेच युवक आणि महिला सक्षमीकरण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर उमेदवारांनी आपली मते मांडली. आगामी निवडणुकीत सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे, प्रामाणिक आणि कार्यक्षम नेतृत्व पुढे आणण्याचा काँग्रेसचा निर्धार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
उमेदवार निवड प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यावर पक्षाचा भर असून सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांच्या विकासासाठी जनतेच्या विश्वासास पात्र उमेदवार देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. या बैठकीस खासदार विशाल पाटील यांच्यासह पक्षाचे अन्य मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा: आरवडेत शेतात कामासाठी गेलेल्या महिलेचे दागिने हिसडा मारून पळविले; चोरट्यांचे धूमस्टाईलने पलायन.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










