सांगली : Fake Income Tax Raid News | कवठेमहांकाळ येथील डॉक्टरांच्या घरी आयकर विभागाचे अधिकारी असल्याचा बनाव करत तब्बल एक कोटी रुपयांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी सांगली पोलिसांनी एका महिलेसह दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले संशयित आरोपी चिंचवड आणि कोल्हापूर परिसरातील आहेत.
रविवारी रात्री एका महिलेसह तीन जण, डॉ. जगन्नाथ म्हेत्रे यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांनी स्वतः आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगत ओळखपत्र दाखवले. त्यानंतर त्यांनी बनावट झडती घेत सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून अंदाजे १ कोटी रुपयांचा मुद्देमाल घेऊन पलायन केले. इतकेच नव्हे तर घरातील सीसीटीव्हीचा डीव्हीआरदेखील सोबत नेला.
या प्रकरणी डॉक्टरांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. तपासात मिळालेल्या माहितीनुसार चिंचवड येथील दीक्षा भोसले (२५) तसेच कोल्हापूरमधील पार्थ मोहिते (२५) आणि साहिल मोहिते (२३) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौथा संशयित अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
🔴 हेही वाचा 👉 लग्नाच्या आदल्या दिवशी तरुणाचा अपघाती मृत्यू; इस्लामपूर बसस्थानकाजवळ दुचाकीला मोटारीची धडक.