सांगली : जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या हुंडामुक्ती अभियानाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून तब्बल 1169 लग्नांमध्ये हुंडा नाकारल्याची नोंद झाली आहे.
महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या मोहिमेत अंगणवाडी सेविकांनी गावपातळीवर जनजागृती करून महत्त्वाची भूमिका बजावली. हुंडा घेणार नाही आणि देणार नाही, असा विचार समाजात रुजवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.
या मोहिमेअंतर्गत लग्नावेळी दोन्ही कुटुंबांकडून हुंडा न घेतल्याचे प्रतिज्ञापत्र घेण्यात आले. जिल्हाभरातून अशा एकूण 1169 प्रतिज्ञापत्रांची नोंद झाली आहे.
ग्रामस्तरावर प्रभावी काम करणाऱ्या 39 अंगणवाडी सेविकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. हुंडा प्रथा रोखण्यासाठी जनजागृती, ग्रामसभांमधून प्रबोधन आणि सामाजिक बदल घडवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरु आहे.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागात हुंडा न घेण्याचा विचार वाढताना दिसत असून जिल्ह्यात सामाजिक बदलाची सकारात्मक चिन्हे दिसत आहेत.
हेही वाचा: सांगलीत मुलींचा जन्मदर घटतोय? जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा; जनजागृती मोहिमेचे आदेश.
- सांगलीत मोठा निर्णय; सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार निबंधक कार्यालये
- सांगलीत ‘हुंडामुक्त’ मोहिमेचा परिणाम; 1169 लग्नांमध्ये हुंडा नाकारला
- सांगलीत मुलींचा जन्मदर घटतोय? जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा; जनजागृती मोहिमेचे आदेश
- वाळव्यात घरासमोर लावलेली दुचाकी चोरीस; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
- जतमध्ये डेप्युटी सरपंचावर हल्ला; लोखंडी गज, हातोड्याने मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
- वाळव्यात मुलाला दगड का मारला विचारायला गेलेल्या वडिलांवर कोयत्याने हल्ला










