सांगली : मार्च महिन्यातील वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व सह दुय्यम निबंधक कार्यालये आता काही सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहेत.
26, 28, 29 आणि 31 मार्च 2026 या दिवशी सुट्टी असूनही दस्त नोंदणीची सर्व कामे सुरू राहणार आहेत. त्यामुळे मालमत्ता खरेदी-विक्री करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.
आर्थिक वर्षाचा शेवट जवळ आल्यामुळे दस्त नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
या काळात नागरिकांनी उपलब्ध सुविधेचा लाभ घेऊन आपली कागदपत्रे वेळेत नोंदणी करून घ्यावीत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा: सांगलीत ‘हुंडामुक्त’ मोहिमेचा परिणाम; 1169 लग्नांमध्ये हुंडा नाकारला.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










