सांगली : जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा तुटवडा नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी वितरण सुरळीत ठेवण्यासाठी प्राधान्यक्रमाने सिलिंडर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घरगुती व व्यावसायिक गॅस वितरणाचा आढावा घेण्यात आला. सध्या तुटवड्याबाबत कोणतीही तक्रार नसली तरी उपलब्ध गॅस योग्य पद्धतीने पोहोचावा, यावर भर देण्यात आला.
रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे तसेच सार्वजनिक सेवा देणाऱ्या ठिकाणी गॅस पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी कंपन्यांना विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तसेच घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर होत नाही ना, याची नियमित तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ग्रामीण भागात सिलिंडर नोंदणीसाठी 45 दिवसांचा कालावधी कमी करण्याबाबतही विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.
या निर्णयामुळे आवश्यक ठिकाणी गॅस उपलब्ध राहण्यास मदत होणार असून वितरण व्यवस्थेवर अधिक नियंत्रण ठेवले जाणार आहे.
हेही वाचा: सांगलीत मोठा निर्णय; सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार निबंधक कार्यालये.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










