Sangli Drought Relief: मंत्री प्रकाश आबिटकर आटपाडीत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; चारा डेपो सुरू करण्याचे निर्देश, वंचित गावांना फेब्रुवारीअखेर टेंभूचे पाणी

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk

सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): जिल्ह्यातील दुष्काळामुळे शेती पिकांचे झालेले अतोनात नुकसान आणि बळीराजासमोरील अडचणी जाणून घेण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आटपाडी तालुक्यातील पिंपरी खुर्द येथे भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसोबत भोजन करून आणि दिवाळी शिध्याचे वाटप करत त्यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला.

संकटाच्या या काळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, आगामी सहा महिन्यांतील संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळी परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी ठोस उपाययोजना आखल्या जात असल्याची ग्वाही यावेळी मंत्री आबिटकर यांनी दिली.

हे ही वाचा: : जमिनीची कागदपत्रे नसली तरी मिळणार शेतकरी ओळखपत्र; राज्य सरकारचा मोठा निर्णय, पाहा नवीन नियम.

साडेपाच लाखांचे केळी पीक वाया; जनावरांसाठी चारा डेपोची मागणी

दौऱ्यादरम्यान पिंपरी खुर्द येथील शेतकरी जगन्नाथ जाधव यांच्या अडीच एकर क्षेत्रातील केळीच्या बागेची पाहणी करण्यात आली. या बागेसाठी सुमारे साडेपाच लाख रुपयांचा खर्च करूनही तीव्र पाणीटंचाईमुळे संपूर्ण पीक करपून गेल्याची व्यथा जाधव यांनी मांडली.

तसेच परिसरातील तीन गावांमधील सुमारे १ हजार ६०० जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून तातडीने शासकीय चारा डेपो सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. यावर गांभीर्य दाखवत मंत्री आबिटकर यांनी आवश्यकतेनुसार तातडीने चारा डेपो सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले.

हेही वाचा: सांगली-कोल्हापूर शेतकरी कर्जमाफी: चौथ्या टप्प्यातील ७६ कोटी थेट बँक खात्यात वर्ग; पाहा संपूर्ण आकडेवारी.

टेंभू योजनेचे पाणी फेब्रुवारीअखेर; ५ हजार रुपयांची मदत

यावेळी उपस्थित असलेले आमदार सुहास बाबर यांनी सांगितले की, “टेंभू उपसा सिंचन योजनेच्या सहाव्या टप्प्यातील काम सध्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. योजनेच्या पाण्यापासून वंचित राहिलेल्या गावांना येत्या फेब्रुवारीअखेरपर्यंत प्रत्यक्ष पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.”

तसेच परिसरातील पीक नुकसानीचे अधिकृत पंचनामे पूर्ण झाले असून, पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५ हजार रुपयांची तातडीची अग्रिम दुष्काळी मदत वर्ग करण्यात आल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. या पाहणी दौऱ्यावेळी तहसीलदार शीतल बंडगर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, कृषी विभागाचे अधिकारी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

📢 महाराष्ट्रातील नवीन सरकारी योजना, शासन निर्णय (GR), हवामान अंदाज, शेतमाल बाजारभाव आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी Sangli Today ला Google वर प्राधान्य असलेले स्रोत म्हणून जोडा.👇

हेही वाचा: दिवाळी संपली, ऑक्टोबरचे ₹१,५०० कधी जमा होणार? मोठी अपडेट; पाहा सरकारचा नवा प्लॅन.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
चॅनेल फॉलो करा