Sangli Voting Day Holiday : १५ जानेवारीला मतदानासाठी भरपगारी सुट्टी; सुट्टी न दिल्यास आस्थापनांवर कारवाईचा इशारा

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
१५ जानेवारीच्या मतदानासाठी भरपगारी सुट्टीबाबत महाराष्ट्र शासनाचे अधिकृत परिपत्रक | फोटो : स्रोत – महाराष्ट्र शासन | संकलन : Sangli Today

सांगली : सांगलीसह राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवार, दि. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी त्या दिवशी भरपगारी सुट्टी (Paid Holiday) जाहीर करण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने अधिकृत शासन परिपत्रक निर्गमित केले आहे.

या परिपत्रकानुसार, शासकीय कार्यालयांसह खाजगी कंपन्या, कारखाने, दुकाने, औद्योगिक व वाणिज्यिक आस्थापना, हॉटेल्स, मॉल्स, आयटी कंपन्या तसेच सेवा क्षेत्रातील आस्थापनांना ही भरपगारी सुट्टी लागू राहणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांना सुट्टी किंवा आवश्यक सवलत न दिल्याने मतदान करता आले नाही, अशा तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनांविरुद्ध कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही शासन परिपत्रकात देण्यात आला आहे.

शासनाने स्पष्ट केले आहे की, निवडणूक क्षेत्रातील मतदार असलेले अधिकारी, कर्मचारी व कामगार हे कामानिमित्त त्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही, त्यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक आहे. काही अत्यावश्यक, लोकोपयोगी किंवा धोकादायक सेवांमध्ये पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास, मतदानासाठी दोन ते तीन तासांची विशेष सवलत देणे आवश्यक असल्याचेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार निर्गमित करण्यात आलेल्या या शासन निर्णयाचा उद्देश, कोणत्याही मतदाराचा मतदानाचा हक्क कामाच्या अडचणींमुळे हिरावला जाऊ नये, हा आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये सुट्टी न मिळाल्याने मतदान न करता आल्याच्या तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून, सर्व संबंधित आस्थापनांनी या आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हेही वाचा: सांगलीत १३ ते १६ जानेवारीदरम्यान ड्राय डे; दारू दुकाने बंद, नियमभंग केल्यास कारवाई.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा