सांगली : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका हद्दीत १३ जानेवारी ते १६ जानेवारी २०२६ या कालावधीत ‘ड्राय डे’ लागू करण्यात आला आहे. या कालावधीत दारूची सर्व दुकाने, परमिट रूम्स तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान पूर्णपणे बंद राहणार आहे.
प्रचार समाप्ती, मतदान आणि मतमोजणी या संपूर्ण प्रक्रियेच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आदेशानुसार १३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून ही बंदी प्रभावी होणार असून, १६ जानेवारीपर्यंत लागू राहणार आहे.
या काळात मद्यविक्री किंवा सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दारू विक्री करणाऱ्या दुकानदारांना व परवाना धारकांना याबाबतची माहिती आधीच देण्यात आली आहे.
दरम्यान, ड्राय डेच्या कालावधीत शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस व प्रशासनाकडून अतिरिक्त खबरदारी घेतली जाणार असून, नियमांचे उल्लंघन झाल्यास तातडीने कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा: ₹९३.५० कोटींच्या मलशुद्धीकरण केंद्र प्रकल्पाबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली माहिती.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










