सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून, यंदा बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे मतदारांना तीन किंवा चार मत द्यायची आहेत. त्यामुळे मतदान केंद्रावर तीन किंवा चार ईव्हीएम मशीन असणार असून, त्याबाबत गोंधळ होऊ नये यासाठी प्रशासनाकडून मतदान प्रक्रियेची माहिती देण्यात आली आहे.
यंदाच्या निवडणुकीत प्रभागाच्या रचनेनुसार काही ठिकाणी तीन, तर काही ठिकाणी चार गटांसाठी स्वतंत्र ईव्हीएम मशीन ठेवण्यात येणार आहेत. मतदान केंद्रावर मतदारांसमोर पांढरे, गुलाबी, पिवळे आणि निळे अशा रंगांचे ईव्हीएम मशीन असतील. प्रत्येक मशीनवर संबंधित गटातील उमेदवारांची यादी दिसणार आहे.
मतदारांनी आपल्या मतदान केंद्रावर असलेल्या सर्व ईव्हीएम मशीनवर आपापल्या पसंतीच्या उमेदवाराचे बटन दाबून मतदान करणे आवश्यक आहे. पहिल्या दोन किंवा तीन मशीनवर बटन दाबल्यानंतर कोणताही आवाज येणार नाही, फक्त लाल दिवा लागेल. शेवटच्या ईव्हीएम मशीनवरील बटन दाबल्यानंतर बीप साउंड ऐकू येईल, आणि त्यानंतरच तुमचे मत नोंदवले जाईल.
त्यामुळे मतदारांनी घाई गडबड न करता आपल्यासमोर असलेल्या सर्व ईव्हीएम मशीनवर मतदान करून बीप साउंड ऐकू आल्या नंतरच मतदान केंद्रातून बाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा: १५ जानेवारीला मतदानासाठी भरपगारी सुट्टी; सुट्टी न दिल्यास आस्थापनांवर कारवाईचा इशारा.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










