Sangli : सांगली जिल्ह्याला मिळाल्या २५ फायबर ग्लास यांत्रिक बोटी

Sangli Today Desk
Sangli Today Desk
Sangli Today Desk ही सांगली टुडे न्यूजची संपादकीय टीम आहे. आमची टीम सांगली जिल्ह्यातील सत्यापित बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते — सामाजिक कार्यक्रम, शिक्षण, शेती, आरोग्य, कायदा व...
Sangli Flood Relief Fiber Boats - Sangli Today Photo

Sangli Flood Management News | सांगली : जिल्ह्यात दरवर्षी उद्भवणाऱ्या पूरसदृश परिस्थितीचा विचार करून आपत्कालीन मदत आणि बचाव कार्य बळकट करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हा परिषद आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या २५ फायबर ग्लास यांत्रिक बोटी आज सांगलीत पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकांसमर्पित करण्यात आल्या.

यावेळी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले की, “पूरग्रस्त भागात वेळेत मदत पोहोचवण्यासाठी सक्षम यंत्रणा असणे गरजेचे आहे. या बोटींच्या उपलब्धतेमुळे बचाव कार्य अधिक प्रभावी होईल. मात्र केवळ आपत्कालीन साधनांवर विसंबून न राहता पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.”

लोकार्पण सोहळ्यास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, तसेच विविध गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि गटविकास अधिकारी उपस्थित होते.

गेल्या काही वर्षांपासून अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. अनेक गावे पुरग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित होतात. अशा वेळी मदत व बचाव कार्य वेगाने करण्यासाठी या बोटी मोठा आधार ठरणार असल्याचे मत यावेळी सर्वांनी व्यक्त केले.

हेही वाचा: विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर अखेर परीक्षा पुढे ढकलण्यात आली.

Share This Article
Sangli Today Desk ही सांगली टुडे न्यूजची संपादकीय टीम आहे. आमची टीम सांगली जिल्ह्यातील सत्यापित बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते — सामाजिक कार्यक्रम, शिक्षण, शेती, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था, नागरिक प्रश्न आणि तालुका स्तरावरील घडामोडींवर लक्ष केंद्रित करते. दररोजच्या स्थानिक घटनांचा आढावा घेऊन अचूक व विश्वासार्ह माहिती देणे हेच आमचे ध्येय आहे.