जन्मतः जबडा अडकलेल्या मुलीवर सांगली जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून यशस्वी शस्त्रक्रिया; मुलीच्या प्रकृतीत सुधारणा

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
फोटो : प्रातिनिधिक छायाचित्र

सांगली | प्रतिनिधी : ईश्वरपूर येथील एका मुलीचा जन्मतः खालचा जबडा अडकलेला असल्याने तिला अन्नग्रहण व बोलण्यास अडचणी येत होत्या. या मुलीवर जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून वैद्यकीय शस्त्रक्रिया व उपचार करण्यात आले असून, उपचारानंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या घरेलू कामगार आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून या मुलीची तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर आवश्यक वैद्यकीय उपचार व खर्चिक शस्त्रक्रिया करण्यात आली. उपचारानंतर मुलीला अन्नग्रहण करता येऊ लागले असून, बोलण्याच्या प्रक्रियेलाही सुरुवात झाल्याचे सांगण्यात आले.

उपचारानंतर संबंधित मुलीने आपल्या वडिलांसह जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी झालेल्या उपचारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विभागीय आयुक्तांनी मुलीची आपुलकीने विचारपूस केली.

या वेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम उपस्थित होते. सदर शस्त्रक्रिया वसंतदादा पाटील दंत रुग्णालय, कवलापूर येथे पार पडली असून, डॉ. श्रीनिवास अष्टेकर, डॉ. सचिन मजती, डॉ. सुरेखा बेडसगावकर व डॉ. अनिरुद्ध पाटील यांच्या वैद्यकीय पथकाने ही शस्त्रक्रिया केली. विभागीय आयुक्तांनी संबंधित वैद्यकीय पथकाच्या कार्याचे कौतुक केले.

हेही वाचा: सांगली जिल्ह्यातील भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी नसबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा