सांगली : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि लातूर जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. पुढील ३ तासांत या भागात जोरदार पावसासह विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सावधानता सूचना (Do’s & Don’ts):
नागरिकांनी अनावश्यक विद्युत उपकरणे बंद ठेवावीत.
घरात आवश्यक जीवनावश्यक वस्तूंचा साठा करून ठेवावा.
अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणे टाळावे.
विद्युत खांबांना स्पर्श करू नये.
उंच झाडांच्या खाली उभे राहू नये.
हा इशारा १९ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटे १ वाजेपर्यंत वैध राहणार असल्याचे शासनाने कळवले आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
🔴 हेही वाचा 👉 आर. आर. पाटील कुटुंब साहित्यविश्वातुनही चर्चेत; राहुल पाटील यांची साहित्य क्षेत्रात नवी ओळख.



