सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या इच्छुकांच्या संयुक्त मुलाखती आज पार पडल्या. आमराई क्लब येथे सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळपर्यंत या मुलाखती घेण्यात आल्या.
या मुलाखती खासदार विशाल पाटील, आमदार जयंत पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांनी घेतल्या. मुलाखतीदरम्यान इच्छुक उमेदवारांचे प्रभागातील सामाजिक काम, जनसंपर्क, संघटनात्मक भूमिका तसेच स्थानिक पातळीवरील कार्याचा आढावा घेण्यात आला.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांची मोठी उपस्थिती या वेळी दिसून आली. कार्यक्रमस्थळी शहरातील विविध प्रभागांमधून इच्छुक उमेदवार सहभागी झाले होते.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज आणि काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्यासह आघाडीतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, निवडणूक प्रक्रियेच्या पुढील टप्प्यांबाबत अधिकृत निर्णय पक्षाकडून लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










