Sangli News | सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने अधिकृत कार्यक्रम जाहीर केल्यानंतर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. मतदार यादी, नामनिर्देशन, मतदान आणि मतमोजणीच्या तारखा निश्चित झाल्याने सर्वच राजकीय पक्षांनी संघटनात्मक पातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी सांगली येथे भाजपच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने संघटनात्मक आढावा, प्रभागनिहाय परिस्थिती आणि पुढील कार्ययोजनांवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली. बैठकीस सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह माजी मंत्री आ. सुरेशभाऊ खाडे, आ. सुधीरदादा गाडगीळ, आ. अतुलबाबा भोसले, भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, माजी आमदार दीनकरतात्या पाटील, नितीन शिंदे, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, निताताई केळकर, पृथ्वीराज पाटील, पृथ्वीराज पवार, सुरेश आवटी, जयश्री पाटील, दिलीप सूर्यवंशी, धीरज सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
निवडणूक कार्यक्रम आधीच जाहीर
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नामनिर्देशन प्रक्रिया 23 ते 30 डिसेंबर 2025 या कालावधीत होणार आहे. 31 डिसेंबर रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होईल, तर 2 जानेवारी 2026 रोजी उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. याच दिवशी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे.
महानगरपालिकेसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. महापालिका क्षेत्रात चार लाखांहून अधिक मतदार असून, सांगली, मिरज आणि कुपवाड या तिन्ही भागांसाठी स्वतंत्र निवडणूक यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.
सर्व पक्षांकडून तयारीला वेग
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर केवळ भाजपच नव्हे तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेसह इतर पक्षांकडूनही उमेदवार चाचपणी, आढावे आणि अंतर्गत बैठका सुरू झाल्याचे चित्र आहे. पुढील काही दिवसांत प्रभागनिहाय राजकीय हालचाली अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा: सांगली जिल्ह्यातील ‘ही’ जिल्हा परिषद शाळा ठरतेय आदर्श; आधुनिक उपक्रमांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी.
- बैलगाडी शर्यतीला गेलेल्या युवकाची मोटारसायकल चोरी; रेठरेधरण येथील घटना
- दिघंची बसस्थानकाजवळील दुकान फोडले; 1.21 लाखांचा ऐवज लंपास
- सांगली महानगरपालिका भरतीच्या नावाने फसवणूक? सोशल मीडियावरील जाहिराती खोट्या
- होळीच्या रात्री पुणे–बेंगलोर महामार्गावर हिट अँड रन; पेठनाक्याजवळ 55 वर्षीय वेटरचा मृत्यू
- इस्राईल-इराण तणाव; दुबईला गेलेल्या कुपवाडमधील 30–35 पर्यटकांशी संपर्क, सुरक्षिततेबाबत प्रशासनाच्या हालचाली सुरू
- सांगली मनपाच्या पहिल्या महासभेत मोठा निर्णय; 30 कोटींच्या नाट्यगृहाला मंजुरी, स्थायी समिती गठीत









