सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर आज सांगली शहरात आयोजित पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षाकडून महापालिका निवडणुकीसाठीचा जाहीरनामा सादर करण्यात आला. या पत्रकार परिषदेला सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ उपस्थित होते.
या जाहीरनाम्यात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा, स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सेवा, शिक्षण व्यवस्था, महिला व युवक सक्षमीकरण यांसह आधुनिक शहरनिर्मितीशी संबंधित विविध मुद्द्यांचा समावेश करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. स्मार्ट सिटीच्या धर्तीवर सांगली, मिरज आणि कुपवाड शहराचा विकास करण्याचा पक्षाचा दृष्टिकोन यावेळी मांडण्यात आला.
पत्रकार परिषदेत बोलताना भाजप नेत्यांनी सांगली शहरासमोरील दैनंदिन नागरी प्रश्न, मूलभूत सुविधा आणि प्रशासनाशी संबंधित अडचणी लक्षात घेऊन जाहीरनामा तयार करण्यात आल्याचे नमूद केले. पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा आणि रस्ते यासारख्या विषयांना प्राधान्य देण्यात आल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या पत्रकार परिषदेला भाजपचे संघटन मंत्री मकरंद देशपांडे, माजी मंत्री तथा आमदार सुरेश खाडे, माजी आमदार दिनकर पाटील, प्रदेश कार्यकारणी सदस्या नीताताई केळकर, दीपक बाबा शिंदे, भाजपा नेते पृथ्वीराज पाटील आणि जिल्हा व शहर पातळीवरील पदाधिकारी तसेच पत्रकार उपस्थित होते.
दरम्यान, सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून प्रचाराची तयारी जोमात सुरु असून, जाहीरनाम्यांच्या माध्यमातून पक्षांची भूमिका आणि विकासाचे मुद्दे मतदारांसमोर मांडले जात आहेत.
हेही वाचा: येडेनिपाणी येथे ‘समृद्ध ग्राम अभियान’ जनजागृती कार्यक्रम; महिलांचा मोठा सहभाग.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










