सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने इच्छुक उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया पूर्ण केली आहे. पाटीदार भवन येथे सलग दोन दिवस चाललेल्या या प्रक्रियेत भाजपकडून अर्ज केलेल्या तब्बल ५७० इच्छुक उमेदवारांची सखोल चाचपणी करण्यात आली.
मुलाखतीदरम्यान उमेदवारांचा सामाजिक व राजकीय अनुभव, पक्षाशी असलेली बांधिलकी, प्रभागातील कामकाज तसेच शहराच्या विकासाबाबतची त्यांची भूमिका यावर समितीकडून थेट संवाद साधण्यात आला. प्रत्येक उमेदवाराशी स्वतंत्र चर्चा करून भविष्यातील निवडणूक रणनीतीच्या दृष्टीने माहिती घेण्यात आली.
संपूर्ण प्रक्रियेला संघटन मंत्री मकरंद देशपांडे, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, प्रदेश उपाध्यक्ष व निवडणूक प्रमुख शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांची उपस्थिती लाभली. वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या मुलाखतींमुळे उमेदवार निवडीत काटेकोरपणा ठेवण्यात आल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
याचे नियोजन जिल्हा सरचिटणीस विश्वजीत पाटील, विशाल पवार, धनंजय कुलकर्णी, स्मिता भाटकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केले होते. दोन दिवस चाललेल्या या प्रक्रियेमुळे भाजपची महापालिका निवडणुकीची तयारी निर्णायक टप्प्यात पोहोचल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा : Dhurandhar 300 कोटी क्लबमध्ये; सांगलीतील मुक्ता ए-2 सिनेमागृहात प्रेक्षकांची मोठी गर्दी.
- बंगळुरू-मुंबई स्लीपर वंदे भारतवरून नवा वाद; सांगली-बेळगावला डावलले जाणार?
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक










