Sangli Miraj Kupwad Politics | सांगली : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उमेदवारांच्या सोयीसाठी समितीचे कार्यालय सुट्टीच्या दिवशीही कार्यरत ठेवण्यात येणार आहे.
दि. २५ डिसेंबर २०२५ (नाताळ), २७ डिसेंबर २०२५ (शनिवार) आणि २८ डिसेंबर २०२५ (रविवार) या दिवशी कार्यालय सुरू राहणार असून, या काळात फक्त महानगरपालिका निवडणूकविषयक जात प्रमाणपत्र पडताळणी अर्जांचीच स्वीकृती केली जाणार आहे, अशी माहिती उपायुक्त तथा सदस्य नागनाथ चौगुले यांनी दिली.
महानगरपालिका निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत ३० डिसेंबर २०२५ असल्यामुळे उमेदवारांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्जदारांनी ccvis.barti.in या संकेतस्थळावर विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
अर्ज सादर करताना उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित राहणे बंधनकारक असून, निवडणूक प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी हा विशेष उपाय करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा: दिव्यांग व्यक्तींच्या छळाविरोधात कठोर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांना थेट अधिकार, SOP लागू.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










