Sangli News | सांगली : संविधान दिनाच्या दिवशी घडलेली ही घटना केवळ प्रशासकीय यशाची नाही, तर माणुसकी जिवंत असल्याचा ठोस पुरावा ठरली आहे. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून बेपत्ता असलेल्या बार्शी (जि. सोलापूर) येथील विजयाबाई रघुनाथ जाधव या वृद्ध आजीबाई अखेर आपल्या कुटुंबात सुखरूप परतल्या असून, या घरवापसीमागे जिल्हा परिषद सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रशासक IAS श्री. विशाल सविता तेजराव नरवाडे यांचा निर्णायक पुढाकार ठरला आहे.
विजयाबाई आजीबाई तब्बल २००० किलोमीटर दूर ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यातील एका वृद्धाश्रमात सापडल्या होत्या. कोणतेही ओळखपत्र, मोबाईल किंवा कुटुंबाचा संपर्क नसलेल्या या आजीबाई अपघाताने इतक्या दूर पोहोचल्या होत्या. झारसुगुडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी IAS कुणाल चव्हाण यांनी क्षेत्रभेटीदरम्यान NGO ‘विकास’ संचलित वृद्धाश्रमात त्यांना पाहिले.
ही माहिती मिळताच IAS विशाल नरवाडे यांनी स्वतः वैयक्तिक जबाबदारी स्वीकारत आजीबाईंना त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार केला. आजीबाईंचा व्हिडिओ तयार करून समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आला आणि नागरिकांना तो मोठ्या प्रमाणावर शेअर करण्याचे आवाहन करण्यात आले.
त्याचा परिणाम लवकरच दिसून आला. ६ डिसेंबर २०२५ रोजी बार्शी येथील नातेवाईकांशी संपर्क झाला. “आम्ही आजीबाईंना दोन वर्षांपासून शोधत होतो,” अशी भावनिक प्रतिक्रिया कुटुंबीयांनी व्यक्त केली.
यानंतर ओडिशातील वृद्धाश्रमाशी समन्वय साधून आजीबाई व एका कर्मचारीसाठी रेल्वे प्रवासाची व्यवस्था करण्यात आली. या संपूर्ण प्रवासाचा खर्चही IAS नरवाडे यांनी स्वतः उचलला. अखेर १० डिसेंबर २०२५ – आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनी, विजयाबाई आजीबाई आपल्या कुटुंबात सुखरूप परतल्या.
ही घटना म्हणजे करुण प्रशासनाचे जिवंत उदाहरण ठरली आहे. संवेदनशील, सहृदय आणि जबाबदार लोकसेवेच्या माध्यमातून दुर्लक्षित घटकांचे मानवी हक्क कसे जपले जाऊ शकतात, याचा हा आदर्श आहे.
या मानवी कार्याची दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग, मुंबई यांच्यासह विविध सामाजिक घटक, वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींनी कौतुक केले आहे.
खऱ्या अर्थाने हा मानवाधिकार दिन एका हरवलेल्या वृद्धेच्या आयुष्यात आशेचा प्रकाश आणणारा ठरला, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
हेही वाचा: दिव्यांग व्यक्तींच्या छळाविरोधात कठोर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांना थेट अधिकार, SOP लागू.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










