Sangli District Primary Teacher Bank Recruitment Postponed | सांगली : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत २० लिपिक पदांसाठी सुरू करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेला तात्काळ स्थगिती देण्यात आली आहे. माजी अध्यक्ष विनायक शिंदे यांनी संचालक मंडळ व अधिकारी वर्गाला विश्वासात न घेता एकतर्फीपणे भरती प्रक्रिया सुरू केल्याचा आरोप करत बँकेच्या अध्यक्षा रूपाली गुरव यांच्यासह दहा संचालकांनी यास विरोध दर्शविला आहे.
मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्षा रूपाली गुरव यांनी सांगितले की, शिक्षक बँकेच्या भरती प्रक्रियेत कर्मचारी उपसमिती, अधिकारी तसेच संचालक मंडळाला अंधारात ठेवण्यात आले. कोणतीही सामूहिक चर्चा किंवा मान्यता न घेता परस्पर भरती सुरू करण्यात आली होती. या प्रक्रियेत अनेक त्रुटी आढळून आल्यामुळे संबंधित खासगी संस्थेशी संपर्क साधून भरतीला स्थगिती देण्यात आली आहे.
अधिकृत संकेतस्थळावरून भरती जाहिरात हटवली
रूपाली गुरव यांनी आरोप केला की, भरती प्रक्रियेचे अधिकार स्वतःकडे ठेवण्यासाठी माजी अध्यक्ष विनायक शिंदे यांनी सातारा जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनशी बनावट कागदपत्रांच्या आधारे करार केल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी पत्र देऊन भरती प्रक्रिया थांबवण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा नागरी बँक असोसिएशनच्या अधिकृत संकेतस्थळावरूनही भरती जाहिरात हटवण्यात आली आहे.
कायदेशीर कारवाईचा इशारा
दि. ८ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या शिक्षक बँक कर्मचारी उपसमितीच्या बैठकीत भरती प्रक्रियेला सर्वानुमते विरोध करण्यात आला होता. तरीही एकाच व्यक्तीच्या सहीवर भरती प्रक्रिया पुढे नेण्यात आल्याने हा प्रकार गंभीर असल्याचे संचालकांचे म्हणणे आहे. याप्रकरणी विनायक शिंदे आणि संबंधित अधिकारी यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
हेही वाचा: दोन वर्षांपासून हरवलेल्या आजींची घरवापसी; IAS विशाल नरवाडे यांच्या पुढाकारातून माणुसकीचा जिवंत अनुभव.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










