Sangli News Today | मिरज : शहरात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेत मिरज शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्टल, जिवंत काडतुसे आणि चारचाकी वाहन असा एकूण 10 लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिरज शहरातील महात्मा गांधी चौक परिसरात नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी संशयास्पद चारचाकी वाहनाची तपासणी केली. तपासणीदरम्यान वाहनामधून एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दस्तगीर शौकत बावा (वय 37) आणि अझल महंमद मदार सय्यद (वय 32, दोघे रा. इसापुरे गल्ली, मिरज) यांना ताब्यात घेतले.
या कारवाईत 40 हजार रुपये किमतीचे देशी पिस्टल, दोन हजार रुपये किमतीची काडतुसे आणि सुमारे 10 लाख रुपये किमतीची टोयोटा इनोव्हा कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी मिरज शहर पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण चौगुले आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा धडक कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा: शिक्षक बँकेतील 20 लिपिक पदांच्या भरतीला स्थगिती, मनमानी कारभारावर संचालकांचा आक्षेप.
- शिराळ्यातील बेलदारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात; विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पुस्तके
- बंगळुरू-मुंबई स्लीपर वंदे भारतवरून नवा वाद; सांगली-बेळगावला डावलले जाणार?
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी










