मिरज : शहरातील रमा उद्यान परिसरात 80 वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने चोरण्याचा प्रकार घडल्यानंतर मिरज शहर पोलिसांनी अवघ्या 20 तासांत गुन्हा उघडकीस आणत तिघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात एका अल्पवयीनासह दोन तरुणांचा समावेश असून, पोलिसांनी 1 लाख 89 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रमा उद्यान परिसरात सकाळच्या सुमारास फिरत असताना संशयितांनी 80 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओढून पळ काढला होता. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने संशयितांचा माग काढण्यात आला. त्यानंतर प्रतिक प्रदीप पाटील (वय 32) आणि मंथन गंगाराम कुंडेकर (वय 18, दोघे रा. मिरज) यांच्यासह एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले.
तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींकडून 9 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 27 हजार रुपये रोख रक्कम तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी असा एकूण 1 लाख 89 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगुले व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
हेही वाचा: मिरज शहर पोलिसांची मोठी कारवाई; बेकायदेशीर शास्त्रासह दोघे अटकेत, 10.42 लाखांचा मुद्देमाल जप्त.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










