सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे काहीच दिवस शिल्लक असताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे प्रभाग क्र. ८ मधील उमेदवार माजी नगरसेवक विष्णू माने यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विष्णू माने यांनी निलेश गडदे यांच्याविरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उमेदवार विष्णू माने हे श्रीहल धेंडे यांच्यासोबत बसले असताना धेंडे यांच्या मोबाईलवरील व्हॉटसअॅपवर निलेश गडदे यांच्याकडून संवाद साधण्यात आला. संबंधित व्यक्तीने माने यांच्याशी थेट बोलण्याची मागणी करत, पूर्वीच्या एका प्रकरणाचा उल्लेख करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, या संवादादरम्यान माने यांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना इजा करण्याची भाषा वापरण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर विष्णू माने यांनी तातडीने संजयनगर पोलीस ठाण्यात धाव घेत लेखी तक्रार दाखल केली.
या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी निलेश गडदे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतली जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










