SMKC Latest News | सांगली : शहरातील नागरिकांच्या दीर्घ प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळाला असून सांगली महापालिकेच्या ताफ्यात दोन नवीन शववाहिका दाखल करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून या वाहनांचा मंजुरी आदेश नुकताच प्राप्त झाला होता.
मागील काही महिन्यांपासून जुनी शववाहिका वारंवार रस्त्यात बंद पडत असल्याने नागरिकांतुन संताप व्यक्त होत होता. त्यामुळे अनेकदा वादावादीचे प्रकारही घडत होते.
नव्या वाहनांच्या सेवेमुळे सांगलीतील नागरिकांची होणारी गैरसोय मोठ्या प्रमाणात दूर होईल.
हेही वाचा: सांगली जिल्हा शिक्षक पुरस्कार २०२५ सोहळा उत्साहात पार पडला.