Sangli News: जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त कार्यक्रमात CEO श्री. विशाल नरवाडे यांच्या कवितेतील ओळींनी जिंकली उपस्थितांची मन

Sangli Today Desk
Sangli Today Desk
Sangli Today Desk ही सांगली टुडे न्यूजची संपादकीय टीम आहे. आमची टीम सांगली जिल्ह्यातील सत्यापित बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते — सामाजिक कार्यक्रम, शिक्षण, शेती, आरोग्य, कायदा व...
Sangli Pharmacist Day Celebration 2025 - Sangli Today Photo

Sangli Pharmacist Day 2025 | सांगली : जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विशाल सविता तेजराव नरवाडे (भा.प्र.से.) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. त्यांच्या सोबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा फार्मसी असोसिएशनचे अध्यक्ष तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

“Think Health, Think Pharmacist” या वर्षीच्या संदेशाचा पुनः उच्चार करताना, CEO श्री. विशाल नरवाडे यांनी आपल्या भाषणात फार्मासिस्ट हे केवळ औषधांचे वितरक नसून खरे आरोग्य प्रहरी, समाजशिक्षक आणि आरोग्य साक्षरतेचे दूत असल्याचे अधोरेखित केले. नकली औषधांविरोधात जागरूकता, प्रतिजैविकांचा योग्य वापर, रक्तक्षय निर्मूलन, महिलांचे आरोग्य आणि ड्रग अब्युजविरोधी मोहिमांमध्ये फार्मासिस्टांनी नेतृत्व घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच डिजिटल आरोग्य, टेली-मेडिसिन आणि ई-फार्मसीमध्ये फार्मासिस्टांच्या वाढत्या भूमिकेवरही त्यांनी प्रकाश टाकला.

कार्यक्रमादरम्यान सेवानिवृत्त फार्मासिस्टांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे नुकतेच रुजू झालेल्या नव्या फार्मासिस्टांचेही स्वागत करून त्यांना प्रेरणादायी शुभेच्छा देण्यात आल्या.

या प्रसंगी CEO विशाल नरवाडे यांनी ‘आरोग्याचा खरा साथीदार – फार्मासिस्ट”
औषधांच्या दुनियेतला ज्ञानी’ ही कविता सादर केली. कवितेतील ओळींनी उपस्थितांची मन जिंकली.:

📌
डॉक्टर लिहितो जीवन वाचवणारी ओळ,
पण औषध देताना त्यात असते तुझी मोल।
योग्य डोस, योग्य वेळ, योग्य माहिती,
तुझ्यामुळेच मिळते रुग्णाला आरोग्यसंपत्ती
॥”
📌

या ओळींनी फार्मासिस्टांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले.
जागतिक फार्मासिस्ट दिनाच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यातील फार्मासिस्टांचा सन्मान करून त्यांच्या आरोग्य क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यात आला.

Share This Article
Sangli Today Desk ही सांगली टुडे न्यूजची संपादकीय टीम आहे. आमची टीम सांगली जिल्ह्यातील सत्यापित बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते — सामाजिक कार्यक्रम, शिक्षण, शेती, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था, नागरिक प्रश्न आणि तालुका स्तरावरील घडामोडींवर लक्ष केंद्रित करते. दररोजच्या स्थानिक घटनांचा आढावा घेऊन अचूक व विश्वासार्ह माहिती देणे हेच आमचे ध्येय आहे.