सांगली : सांगलीतील राजस्थानी ठेकेदाराच्या खूनप्रकरणी फरार असलेल्या संशयिताला संजयनगर पोलिसांनी गोव्यातून अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून तो फरार होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमकुमार पवनकुमार बराला (वय 21, रा. जेतूसरा, ता. श्रीमाधवपूर, जि. सिकर, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
प्रेमकुमार बराला हा सांगलीत फरशी काम करणाऱ्या गोपालसिंह बेगाराम भदाला या ठेकेदाराकडे कामासाठी आला होता. दोघेही जवळच राहत होते.
दरम्यान, पत्नीची छेड काढल्याचा राग मनात धरून प्रेमकुमारने 27 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास भांडणात भदाला यांच्यावर खोऱ्याच्या प्लास्टिकच्या दांड्याने हल्ला केला होता. या घटनेत गोपालसिंह भदाला यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर संशयित पत्नीसह सांगलीतून फरार झाला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे त्याचा माग काढत शोधमोहीम सुरू केली.
संजयनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सतीश कदम यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने संशयिताला गोव्यातून ताब्यात घेतले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
येथे वाचा: Sangli Crime News Today.
हेही वाचा: सांगलीत जलशुद्धीकरण केंद्र, शेरी नाला पंपहाऊसची आयुक्तांची पाहणी; अमरधाम गॅस दाहिनी दुरुस्तीचे आदेश.
- सांगली जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ सुरू; ७ मार्चपासून ६९ मंडळांमध्ये आयोजन
- सांगलीत पत्नीची छेड काढल्याच्या रागातून मित्राचा खून; संशयितास गोव्यातून अटक
- सांगलीत जलशुद्धीकरण केंद्र, शेरी नाला पंपहाऊसची आयुक्तांची पाहणी; अमरधाम गॅस दाहिनी दुरुस्तीचे आदेश
- वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथे डंपर पलटी; उपचारादरम्यान चालकाचा मृत्यू
- सांगलीच्या शासकीय रुग्णालयात धक्कादायक प्रकार; प्रसूतीनंतर नवजात बाळाला सोडून आई गायब
- माधवनगरमध्ये घरासमोरून दुचाकी चोरी; संजयनगर पोलिसांत गुन्हा दाखल









