सांगली : जिल्ह्यात महसूल विभागाच्या विविध सेवांसाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली.
जिल्ह्यातील १३ तहसील कार्यालयांअंतर्गत ६९ मंडळांमध्ये ही शिबिरे घेण्यात येणार असून ७ मार्च ते १५ मे या कालावधीत या शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या शिबिरांमध्ये महसूल अभिलेख दुरुस्ती, सातबारा उताऱ्यातील सुधारणा, विविध प्रमाणपत्रांचे वितरण तसेच सामाजिक व शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
तसेच प्रलंबित फेरफार प्रकरणांचा निपटारा, तुकडेबंदी कायद्याशी संबंधित प्रकरणे आणि डिजिटल सेवांचा प्रचार यावरही भर दिला जाणार आहे.
जिल्ह्यात ७ मार्च, १४ मार्च, १० एप्रिल, १७ एप्रिल, ८ मे आणि १५ मे या दिवशी विविध ठिकाणी समाधान शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी काकडे यांनी सांगितले.
या शिबिरांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी संबंधित मंडळ व तहसील स्तरावर उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा: सांगलीत पत्नीची छेड काढल्याच्या रागातून मित्राचा खून; संशयितास गोव्यातून अटक.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










