ईश्वरपूर : ईश्वरपूर शहरातील निर्जन ठिकाणी मद्यपान करत बसलेल्या तरुणांवर पोलिसांनी कारवाई करत सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांकडून मिळालेल्या तक्रारीनंतर ईश्वरपूर पोलिसांनी शुक्रवारी रात्री शहरातील काही ‘डार्क स्पॉट’ परिसरात अचानक छापे टाकले.
या कारवाईदरम्यान कृष्णबंगला परिसरातील मोकळ्या पटांगणात तसेच वाघवाडी रोडलगत असलेल्या कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर काही तरुण परवान्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करताना आढळून आले.
याप्रकरणी चिमणीलाल गौतम पुजारी (19), सुनील मनीराम जयस्वाल (20), समीर बुद्धिराम गौतम (20, सर्व रा. शिवनगर, ईश्वरपूर) तसेच विशाल विकास कदम (28), वैभव उदयसिंग कदम (30), विजय जगन्नाथ कदम (27) आणि विशाल हरी कदम (28, सर्व रा. शिराळा) यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक किरण दिडवाघ व त्यांच्या पथकाने ही कारवाई करण्यात आली.
हेही वाचा: सांगली जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ सुरू; ७ मार्चपासून ६९ मंडळांमध्ये आयोजन.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










