सांगली (जत): सोरडी (ता. जत) येथे शेतजमिनीच्या वाटपावरून वडील आणि मुलामध्ये झालेल्या वादाने हिंसक वळण घेतले. संतप्त मुलाने वडिलांवर काठीने हल्ला करून मारहाण केली. ही घटना शुक्रवारी रात्री घडली असून तुकाराम केराप्पा पाटील (वय 58) असे जखमी वडिलांचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री घरातच शेतजमिनीच्या वाटणीवरून वडील–मुलामध्ये वाद चिघळला. त्यात मुलगा दीपक तुकाराम पाटील (वय 32) याने वडिलांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यानंतर लाकडी काठीने डोक्यावर व छातीवर मारहान केली.
या मारहाणीमध्ये तुकाराम पाटील हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या डोक्याला तीन टाके घालावे लागले तसेच बरगड्यांना दुखापत झाली आहे. घटनेनंतर जखमींनी जत पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
हेही वाचा: तासगाव तालुक्यातील तरुणाला ऑनलाईन जॉबच्या नावाखाली १६ लाखांचा गंडा.