सांगली : पत्नीला माहेरातून परत न पाठवल्याच्या रागातून जावयाने सासूवर लोखंडी कड्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना संजयनगर परिसरात घडली. दारूच्या नशेत आलेल्या जावयाने घरासमोर दंगा घालत थेट सासूवरच हल्ला केला.
फिर्यादी सत्यवा बिरु कोकरे (वय ४०) यांच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी दुपारच्या सुमारास संशयित आरोपी राहुल धुळा कोळेकर (वय २९) हा त्यांच्या घरी आला. दारातूनच ‘मुलीला माझ्यासोबत पाठवा’ अशी आरडा ओरड करत त्याने शिवीगाळ सुरू केली. काही वेळातच त्याने घराच्या दरवाजावर दगडफेक सुरु केली.
दरवाजा उघडून बाहेर येताच त्याने हातातील लोखंडी कडे त्यांच्या डोक्यावर मारले. या हल्ल्यात त्या जखमी झाल्या. घटनेनंतर जावई घटनास्थळावरून पसार झाला.
जखमीवर उपचार करून संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संजयनगर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: सांगली जिल्हा परिषद सत्तेसाठी जोरदार संघर्ष; ‘व्हीप’वरून चंद्रकांत पाटील–जयंत पाटील आमनेसामने.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










