Sankh Taluka Demand: संख स्वतंत्र तालुका व्हावा; ग्रामस्थांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
Sankh Independent Taluka Demand Vikram Sawant Support | फोटो सौजन्य : X / @INCVikramsawant

Sankh Taluka | Sangli News : जत : जत तालुका भौगोलिकदृष्ट्या अत्यंत विस्तीर्ण असल्याने नागरिकांना दैनंदिन प्रशासकीय कामकाजासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर संख स्वतंत्र व पर्यायी तालुका व्हावा या मागणीसाठी संख येथील ग्रामस्थांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.

या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जतचे माजी आमदार विक्रम सावंत यांनी मंगळवारी संख येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भेट देत उपोषणकर्त्यांशी थेट संवाद साधला. ग्रामस्थांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेत सावंत यांनी या मागणीला जाहीर पाठिंबा दिला.

विक्रम सावंत म्हणाले की, “संख स्वतंत्र तालुका व्हावा ही मागणी केवळ एका गावापुरती मर्यादित नसून संपूर्ण परिसराच्या प्रशासकीय सोयी, विकास आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांशी संबंधित आहे. जत तालुक्याचा विस्तार पाहता स्वतंत्र तालुक्याची गरज वास्तववादी आहे.”

ते पुढे म्हणाले की, लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनाकडे शासनाने सकारात्मक दृष्टीने पाहावे आणि या प्रश्नावर शासन स्तरावर ठोस निर्णय घ्यावा. संख व परिसरातील नागरिकांना न्याय मिळण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

संख स्वतंत्र तालुका निर्मितीमुळे प्रशासकीय कामकाज सुलभ होईल, नागरिकांचा वेळ व खर्च वाचेल, तसेच परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली आहे.

हेही वाचा: ईश्वरपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; दोघे आरोपी अटकेत, पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल.

TAGGED:
Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा