Sangli Accident News | सांगली : मिरज तालुक्यातील सावळी गावात झालेल्या अपघातात एका 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. गाव तलावाच्या समोरील रस्त्यावरून पायी जात असताना पाठीमागून आलेल्या क्रेनने धडक दिल्याने संतू भीमा भोरे (रा. कानडवाडी) गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना तातडीने मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
कुपवाड पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे. पोलिसांनी क्रेन चालक संतोष गोरख बाबर (रा. दत्तनगर, बामणोली, मूळ सांगोला) याला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: एसटीचा विश्रामबाग कक्ष सुरू; २ नवीन बसेस व ५० गाड्यांना थांबा, विद्यार्थ्यांसाठी पास सुविधा.