सांगली : जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान खानापूर विधानसभा मतदारसंघातील एका सभेत केलेल्या वक्तव्यामुळे शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्यावर भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली असून, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनीही बाबर यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत बाबर यांना सल्ला दिला आहे.
मुंबईत माध्यमांशी बोलताना महाजन यांनी, मुख्यमंत्र्यांचा एकेरी पद्धतीने उल्लेख करणे अयोग्य असल्याचे सांगितले. अशा प्रकारची भाषा राजकीय संस्कृतीला धरून नसल्याचे महाजन म्हणाले. सुहास बाबर यांची ही पहिलीच टर्म असून ती शेवटची ठरू शकते, त्यामुळे त्यांनी वक्तव्यांमध्ये संयम ठेवणे गरजेचे असल्याचा सल्लाही त्यांनी दिला.
बाबर यांनी केलेल विधान चुकीच असल्याच सांगत, “राजकारणात बोलताना तोल सांभाळणे आवश्यक असते. अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात,” असा इशाराही महाजन यांनी दिला. या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, उपमुख्यमंत्री आणि शिंदेसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांना समज द्यावी, अशी अपेक्षाही महाजन यांनी व्यक्त केली. या वक्तव्यामुळे खानापूर विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिंदेसेना यांच्यातील राजकीय तणाव अधिकच वाढत चालल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा: मुख्यमंत्र्यांबाबत अयोग्य भाषा वापरणाऱ्यांना जनताच योग्य उत्तर देईल, गोपीचंद पडळकर यांचा इशारा.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










