सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२६ अंतर्गत ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीदरम्यान जिल्ह्यातील सर्व मतमोजणी केंद्रांच्या परिसरात कडक प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. शांतता राखण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी अशोक काकडे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अन्वये हे आदेश जारी केले आहेत.
आदेशानुसार मतमोजणी केंद्रापासून २०० मीटरच्या परिसरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींच्या एकत्रित जमावास मनाई करण्यात आली आहे. तसेच या परिसरात झेरॉक्स मशीन, टेलिफोन बुथ, फॅक्स मशीन, ध्वनीक्षेपकांचा वापर बंद राहणार असून, मतमोजणी केंद्रात मोबाईल व पेजर वापरण्यासही मनाई असेल.
हे आदेश निवडणूक कर्तव्य बजावणाऱ्या शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना लागू होणार नाहीत. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजल्यापासून संबंधित मतमोजणी केंद्रावरील प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हे निर्बंध अंमलात राहतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात एकूण १० मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी होणार असून, प्रशासनाने आवश्यक त्या सर्व सुरक्षात्मक उपाययोजना केल्याचे सांगण्यात आले आहे.
तालुकानिहाय मतमोजणी केंद्रे
- आटपाडी: दुसरा मजला हॉल, नवीन प्रशासकीय इमारत, तहसीलदार कार्यालय
- जत: जुने शासकीय धान्य गोदाम क्र. २, नवीन प्रशासकीय इमारतीसमोर
- खानापूर: इनडोअर स्पोर्ट्स फॅसिलिटी सेंटर, बळवंत कॉलेज, विटा
- कडेगाव: औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), कराड-कडेगाव रोड
- तासगाव: शासकीय बहुउद्देशीय कक्ष, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दत्तमाळ
- कवठेमहांकाळ: पुरवठा शाखेसमोरील मोकळी जागा, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत
- पलूस: मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, न्यायालयाजवळ
- वाळवा: शासकीय धान्य गोदाम, बहे रोड, ईश्वरपूर
- शिराळा: श्री गोरक्षनाथ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
- मिरज: शासकीय नवीन धान्य गोदाम, वैरण बाजार
हेही वाचा: मुख्यमंत्र्यांबाबतच्या वक्तव्यावर आमदार सुहास बाबर यांना गिरीश महाजन यांचा सल्ला.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










