सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना, सांगली येथे आर्थिक वर्ष २०२४-२५ ची ६८ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने कारखाना विकासाच्या विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.
सभेत डिस्टलरी विभागाबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला. न्यायालयाचा निकाल कारखान्याच्या बाजूने लागल्यामुळे लवकरच हा विभाग पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच कारखान्याचा दत्त इंडिया कंपनीसोबतचा करार लवकरच संपुष्टात येणार असून त्यानंतर कारखाना पुन्हा सभासदांच्या मालकीचा होणार असल्याचे सांगण्यात आले.
शासन धोरणानुसार प्रत्येक शेअरची किंमत १५ हजार रुपये ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्यांचे भांडवल या मर्यादेपेक्षा कमी आहे, त्यांनी तफावत भरून पूर्ण भांडवल करावे, असे आवाहन करण्यात आले. याशिवाय सभासदांना दिली जाणारी साखर आजपासून उपलब्ध करून देण्यात आली असून ती थेट गावपातळीवर पोहोचवण्याची सुविधा कारखान्याने उपलब्ध केली आहे.
हेही वाचा: सांगलीत दुर्दैवी घटना – क्रेनच्या धडकेत 70 वर्षीय वृद्ध ठार.