वाळवा तालुक्यात भीषण अपघात; पुलावर दुचाकी आदळून युवकाचा मृत्यू, मित्र गंभीर जखमी

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथे पुलावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू. (प्रातिनिधिक छायाचित्र)

सांगली : वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द परिसरात दुचाकी पुलाच्या कठड्यावर आदळून झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला असून त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (४ मार्च) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल मारुती भडकंबेकर (रा. भडकंबे, ता. वाळवा) व त्याचा मित्र बळवंत यशवंत बनसोडे हे दोघे दुचाकीवरून ऐतवडे खुर्दहून भडकंबे गावाकडे जात होते.

सूर्यवंशी मळा येथील ओढ्यावरील पुलाजवळ भरधाव वेगात असतानाच दुचाकीवरील नियंत्रण सुटून दुचाकी पुलाच्या कठड्याला जोरात धडकली. या अपघातात दोघेही रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले.

स्थानिक नागरिकांनी त्यांना उपचारासाठी ईश्वरपूर येथील प्रकाश हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने राहुल भडकंबेकर याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

बळवंत बनसोडे याच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कुरळप पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

येथे वाचा: Sangli Latest Accident News.

हेही वाचा: इराण-इस्रायल तणावामुळे तेल दर वाढणार? सांगलीत पेट्रोल 104.07 रुपये; सध्या दरवाढ नाही.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा