वाळवा : कार्वे गावात दोन दिवस पाच वर्षांच्या चिमुरडीच्या कथित अपहरणामुळे भीतीचे वातावरण होते. अज्ञात व्यक्तीने किंवा बिबट्याने मुलीला पळवून नेल्याच्या चर्चांनी गाव ढवळून निघाले होते. मात्र कुरळप पोलिसांच्या तपासात हा संपूर्ण प्रकार बनावट असल्याचे उघड झाले असून, मुलीच्या आईनेच तिला ओळखीच्या नातेवाईकांकडे पाठवून अपहरणाचा बनाव केल्याचे समोर आले आहे.
दि. 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी कार्वे येथून पाच वर्षांची आर्यन्सी प्रकाश चव्हाण बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आजोबांनी कुरळप पोलिस ठाण्यात दाखल केली होती. अपहरणाचा गुन्हा नोंद होताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना दुसऱ्याच दिवशी महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. दि. 9 फेब्रुवारी रोजी मुलगी शास्त्रीनगर, मलकापूर (ता. कराड) येथे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिस पथकाने तत्काळ तेथे जाऊन मुलीला सुखरूप ताब्यात घेतले.
यानंतर झालेल्या चौकशीत अपहरणाचा कोणताही प्रकार घडलेला नसल्याचे स्पष्ट झाले. मुलीची आई शिवानी प्रकाश चव्हाण (वय 24) हिनेच मुलीला नातेवाईकांकडे पाठवून नंतर अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा बनाव केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
हेही वाचा: सांगली महानगरपालिकेची 66 कोटींची घरपट्टी वसुली; नागरिकांच्या तक्रारींसाठी दर गुरुवारी 3 ते 5 विशेष वेळ.
- बैलगाडी शर्यतीला गेलेल्या युवकाची मोटारसायकल चोरी; रेठरेधरण येथील घटना
- दिघंची बसस्थानकाजवळील दुकान फोडले; 1.21 लाखांचा ऐवज लंपास
- सांगली महानगरपालिका भरतीच्या नावाने फसवणूक? सोशल मीडियावरील जाहिराती खोट्या
- होळीच्या रात्री पुणे–बेंगलोर महामार्गावर हिट अँड रन; पेठनाक्याजवळ 55 वर्षीय वेटरचा मृत्यू
- इस्राईल-इराण तणाव; दुबईला गेलेल्या कुपवाडमधील 30–35 पर्यटकांशी संपर्क, सुरक्षिततेबाबत प्रशासनाच्या हालचाली सुरू
- सांगली मनपाच्या पहिल्या महासभेत मोठा निर्णय; 30 कोटींच्या नाट्यगृहाला मंजुरी, स्थायी समिती गठीत









