सांगली : मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियानाच्या जनजागृती आणि प्रचाराच्या निमित्ताने वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात ग्रामविकास, पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली.
या वेळी बोलताना अभिनेते संदीप पाठक यांनी समृद्ध ग्राम अभियानात सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. खेड्यांचा विकास हा पर्यावरणपूरक उपक्रमांतून शक्य असून प्लास्टिक संकलन, वृक्षारोपण, स्वच्छता आणि पारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमासाठी अभिनेत्री शिवाली परब उपस्थित होत्या. त्यांनी येडेनिपाणी गावात राबवण्यात आलेल्या उपक्रमांचे कौतुक करत प्लास्टिक संकलन, आरोग्य शिबिरे आणि वृक्षारोपण यांसारख्या उपक्रमांमुळे गावाने एक सकारात्मक आदर्श निर्माण केल्याचे सांगितले.
महिलांचा सन्मान व विविध उपक्रम
मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियानांतर्गत सुंदर परसबाग आणि स्वच्छ अंगण स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते पार पडला. या अंतर्गत एकूण 47 महिलांना सन्मानित करण्यात आले. यावेळी सौर ऊर्जा संचांचे वितरण, आरोग्य शिबिराचे उद्घाटन तसेच वृक्षारोपण कार्यक्रमही पार पडले.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे, वाळव्याचे गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, सहाय्यक गटविकास अधिकारी सावंत, अभियानाचे समन्वयक श्रीधर कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी संजय बुवा, विस्तार अधिकारी एस. आर. पाटील यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, आशा सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच श्यामबाला माळी यांनी केले, तर उपसरपंच प्रताप पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
हेही वाचा: अजित पवार यांची मिरजेत प्रचारसभा; नागरी प्रश्न, पाणीपुरवठा व विकासाच्या मुद्द्यांवर भर.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









