Sangli Politics News | पुणे : बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि मतदारांचा विश्वासघात या मुद्द्यांवर युवक काँग्रेसकडून पुण्यात भव्य मशाल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी केली.
मोर्चादरम्यान “वोट चोर गद्दी छोड” आणि “नोकरीचोर गद्दी छोड” अशा घोषणा देत युवकांनी संताप व्यक्त केला. युवक काँग्रेसने आरोप केला की, शिक्षित तरुणांच्या हाताला काम नाही, रोजगाराच्या संधी कमी होत चालल्या आहेत, मात्र सरकार गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. दुसरीकडे, मतदारांचा विश्वासघात करून लोकशाही पायदळी तुडवली जात आहे.
काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केले की, हा लढा केवळ बेरोजगारीपुरता मर्यादित नसून मतदारांच्या सन्मानासाठी आहे. “मतदारांचा अपमान, अन्याय व भ्रष्टाचाराविरोधातील हा लढा रस्त्यावर आला आहे. आता महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाचा आवाज सरकारला ऐकावा लागेल, अन्यथा युवकांचा हा आक्रोश आणखी तीव्र केला जाईल,” असा इशारा मोर्चादरम्यान देण्यात आला.
या भव्य मोर्चात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, पलूस-कडेगावचे आमदार डॉ. विश्वजीत कदम, तसेच अनेक पदाधिकारी, मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा: मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपले, शेकडो घरांत पाणी, 40 रस्ते-पूल बंद.