Sangli Accident: ट्रकच्या भीषण धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू तर एक जखमी, चालक फरार

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
Sangli Peth Truck Accident Bike Rider Death Driver Absconding (Sangli Today Photo)

ईश्वरपूर : वाळवा तालुक्यातील पेठ येथे महामार्गावरील पुलावर गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. पाठीमागून आलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकीवर मागे बसलेले धनाजी तुकाराम थोरात (वय 37, रा. ओंड, ता. कराड) हे रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. उपचाराअभावी त्यांचा मृत्यू झाला.

जखमी शशांक राजाराम सुतार (वय 40) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोघेही गुरुवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास महामार्गावरून दुचाकीने (क्र. MH 05 AT 5764) प्रवास करत होते. त्याचवेळी मागून आलेल्या ट्रकने (क्र. MH 11 CH 7001) पुलावर त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

धडक लागल्याने धनाजी थोरात यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. शशांक सुतार यांच्या पायाला दुखापत झाल्याने त्यांना ईश्वरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालक वाहन सोडून घटनास्थळावरून फरार झाला. ईश्वरपूर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा: नोकरीच्या आमिषाने सव्वा लाखाची फसवणूक, दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा