Fraud Case : नोकरीच्या आमिषाने तरुणाला 18 लाखांचा गंडा; वाळव्यातील व्यक्तीवर गुन्हा दाखल

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
Youth duped of Rs 18 lakhs on the promise of a job Case registered against person from Walwa (Sangli Today Photo)

Fraud Case Sangli : पन्हाळा तालुक्यातील काखे येथील तरुणाची वन विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तब्बल 18 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वाळवा (जि. सांगली) येथील शिवाजी बाळकृष्ण अहिर याच्यावर कोडोली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

काखे येथील राजश्री संभाजी पाटील यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकाच गावातील असल्याने त्यांच्यात ओळख होती. या ओळखीचा गैरफायदा घेत शिवाजी अहिर याने राजश्री पाटील यांना त्यांच्या मुलाला वन विभागात नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले.

नोकरी लावण्यासाठी 18 लाख रुपये लागतील असे सांगून 2022 पासून टप्प्याटप्प्याने आरोपीने ही रक्कम स्वीकारली. अनेक महिने उलटूनही नोकरीची काहीही प्रक्रिया न झाल्याने पाटील यांनी पैसे परत मागितले. मात्र, आरोपीने रक्कम परत देण्यास नकार दिल्याने फसवणूक उघड झाली.

या प्रकरणी कोडोली पोलिसांनी गुन्हा दाखल झाला असून पुढील तपासाची जबाबदारी सहायक पोलिस निरीक्षक कैलास कोडग यांच्याकडे दिली आहे.

हेही वाचा: ट्रकच्या भीषण धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू तर एक जखमी, चालक फरार.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा