कुपवाड : कुपवाड एमआयडीसी परिसरातील माईंड फ्लो या औद्योगिक कारखान्यातून तब्बल सात लाख रुपये किमतीचे ॲल्युमिनियम पॅटर्न चोरीस गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवारी सकाळी ही चोरी निदर्शनास आल्यानंतर कुपवाड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 25 मे ते 22 नोव्हेंबर 2025 या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी कारखान्याच्या कुंपणाच्या भिंतीवरून आत प्रवेश करून ही चोरी केली. चोरट्यांनी कंपनीतील सुमारे 7 लाख रुपये किमतीचे, एकूण 1,250 किलो वजनाचे लहान व मोठ्या आकाराचे 50 ॲल्युमिनियम पॅटर्न लंपास केले.
हा प्रकार लक्षात येताच कारखान्याचे इन्चार्ज राकेश परशुराम महाजन (रा. बामणोली) यांनी कुपवाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.
एमआयडीसी परिसरात यापूर्वीही चोरीच्या घटना घडल्याने औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी कुपवाड पोलिस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा: भाजप आक्रमक, विरोधक विस्कळीत; सांगली महापालिकेत महाविकास आघाडीची कसोटी.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










