मिरज : मिरजेत बेदाण्याच्या व्यापारात मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पाटणा (बिहार) येथील व्यापाऱ्याने बेदाणा खरेदी करून त्याची रक्कम न देता मिरजमधील व्यापाऱ्याला तब्बल 75 लाख 28 हजार 377 रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी केयूर गिरीशकुमार शहा यांनी तक्रार दाखल केली आहे. केयूर शहा हे मिरजेत ‘जी. एस. शहा अॅण्ड कंपनी’ या नावाने बेदाण्याचा व्यवसाय करतात, तर त्यांच्या पत्नीच्या नावावर ‘दृष्टी अॅग्रोटेक फर्म’ कार्यरत आहे. तक्रारीनुसार, पाटणा येथील व्यापारी मनोजकुमार यादव हा शहा यांच्या संपर्कात होता.
मनोजकुमार यादव याने 10 जानेवारी 2023 रोजी जी. एस. शहा अॅण्ड कंपनीकडून सुमारे 15 लाख 28 हजार रुपयांचा, तसेच दृष्टी अॅग्रोटेक फर्मकडून 59 लाख 99 हजार रुपयांचा बेदाणा खरेदी केला होता. मात्र, माल स्वीकारल्यानंतरही संबंधित व्यापाऱ्याने कोणतीही रक्कम अदा केली नाही.
रक्कम मिळण्यासाठी केयूर शहा यांनी वारंवार संपर्क साधून पाठपुरावा केला, मात्र समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
हेही वाचा: कुपवाड एमआयडीसीत कारखान्यात मोठी चोरी; सात लाखांचे ॲल्युमिनियम पॅटर्न लंपास.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










