सांगली : सांगली जिल्ह्यात पुढील काही दिवस थंडीचा प्रभाव वाढण्याची शक्यता असून किमान तापमान 11 ते 14 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याचा अंदाज कृषी हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. ग्रामीण कृषी मौसम सेवा, कोल्हापूर आणि विभागीय कृषी संशोधन केंद्राने जारी केलेल्या अॅग्रोमेट सल्ला बुलेटिननुसार, शेतकऱ्यांनी पिके आणि पशुधनाच्या संरक्षणासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान अंदाजानुसार, पुढील पाच दिवस सांगली जिल्ह्यात आकाश प्रामुख्याने स्वच्छ राहण्याची शक्यता असून पावसाची शक्यता नगण्य आहे. मात्र रात्री आणि पहाटेच्या वेळेत तापमानात लक्षणीय घट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे गहू, हरभरा, रब्बी ज्वारी तसेच भाजीपाला पिकांवर थंडीचा परिणाम होऊ शकतो.
कृषी विभागाने दिलेल्या सल्ल्यानुसार, थंडीपासून संरक्षणासाठी पिकांना आवश्यकतेनुसार पाणी द्यावे, कोवळ्या पिकांवर थंडीचा ताण येऊ नये यासाठी सकाळच्या वेळेत हलके सिंचन करावे. द्राक्ष, ऊस आणि फळबागांमध्ये कीड व रोग व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष देण्याचे सूचित करण्यात आले आहे.
दरम्यान, पशुधनासाठीही विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. रात्री जनावरे उघड्यावर बांधू नयेत, गोठ्यात थंडीपासून संरक्षणाची व्यवस्था करावी तसेच पुरेसा चारा आणि पाणी उपलब्ध ठेवावे, असे कृषी तज्ज्ञांनी सांगितले.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना हवामानातील बदल लक्षात घेऊन शेती कामांचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा: मिरजेत बेदाणा व्यापाऱ्याला गंडा; 75 लाखांची फसवणूक.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










