सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या आधुनिकीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीने 1 कोटी 18 लाख रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे. या निधीतून अग्निशमन दलासाठी अत्याधुनिक सुरक्षा व बचाव उपकरणांची खरेदी करण्यात येणार असून, आग, पूर आणि अपघातांच्या घटनांमध्ये अधिक वेगवान व सुरक्षित मदत पुरवणे शक्य होणार आहे.
महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी अग्निशमन विभागाच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी हा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार फायर फायटर सूट, SCBA श्वसन यंत्रणा, बॅटरी ऑपरेटेड कॉम्बी टूल, रिमोट कंट्रोल लाईफबॉय, पोर्टेबल पंप, स्ट्रेचर आणि होजपाईप यांसारखी महत्त्वाची उपकरणे खरेदी केली जाणार आहेत.
या नव्या साधनसामग्रीमुळे अग्निशमन जवानांची वैयक्तिक सुरक्षितता वाढणार असून, उंच इमारतींमधील आग, पूरपरिस्थितीतील बचावकार्य तसेच अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्यासाठी लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
सांगली-मिरज-कुपवाड परिसरात वाढती लोकसंख्या, औद्योगिक वसाहती आणि वाहतूक दाटी लक्षात घेता अग्निशमन दलाचे आधुनिकीकरण अत्यंत गरजेचे होते. मंजूर निधीमुळे मनपाच्या अग्निशमन दलाच्या क्षमतेत लक्षणीय वाढ होणार असून, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना अधिक प्रभावी सेवा देणे शक्य होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा: सांगलीत पुढील पाच दिवस थंडीचा कडाका; कृषी विभागाचा इशारा.
- Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांची दिवाळी गोड! ३०४ तालुक्यांतील दीड कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी ५,००० रुपये थेट खात्यात; राज्य सरकारचा ७,५०० कोटींचा निर्णय, GR जारी
- Maharashtra Weather: बंगालच्या उपसागरात ‘अर्णब’ चक्रीवादळाचे थैमान; गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट, पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडणार का?
- ST Employee Salary: एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! शासनाकडून ₹३९१ कोटींचा निधी मंजूर; खात्यात कधी जमा होणार पगार?
- Gold Price Prediction 2036: येत्या दशकात सोन्याचा भाव कुठे पोहोचेल? जुन्या आकडेवारीवर आधारित गणित काय सांगतय, वाचा सविस्तर
- Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ; खरेदीपूर्वी पाहा सांगली, पुण्यासह PNG चे आजचे दर (२७ ऑक्टोबर २०२६)
- Maharashtra Weather: राज्यात उन्हाचा चटका वाढला, पारा ३६ पार; ‘या’ ३ जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा, पाहा आजचा हवामान अंदाज









