Ladki Bahin Yojana Ekyc Correction Last Chance | सांगली : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. e-KYC प्रक्रियेदरम्यान झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी शासनाकडून केवळ एकदाच अंतिम संधी देण्यात येणार असून ही संधी 31 डिसेंबर 2025 पर्यंत उपलब्ध असणार आहे.
राज्यातील बहुतांश लाडक्या बहिणी ग्रामीण आणि दुर्गम भागातील असल्याने e-KYC करताना चुकांची शक्यता अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात अनेक लाभार्थींनी आणि विविध स्तरांतून महिला व बालविकास विभागाकडे निवेदने सादर करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शासनाने हा निर्णय घेतला आहे.
महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या योजनेत कोणतीही पात्र महिला वंचित राहू नये, यासाठी e-KYC मधील त्रुटी सुधारण्याची ही एकमेव संधी देण्यात आली आहे. ठरलेल्या मुदतीनंतर e-KYC दुरुस्तीची परवानगी मिळणार नसल्याने लाभार्थींनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, ज्या लाभार्थी महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत, अशा महिलांसाठीही e-KYC प्रक्रिया पूर्ण करता यावी यासाठी पोर्टलवर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे विधवा, एकल किंवा निराधार महिलांना दिलासा मिळाला आहे.
e-KYC प्रक्रिया अधिक सुलभ, सोपी आणि पारदर्शक करण्यासाठी महिला व बालविकास विभाग प्रयत्नशील असून, जास्तीत जास्त पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी विभाग कटिबद्ध असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा : पुढील पाच दिवस थंडीचा कडाका; कृषी विभागाचा इशारा.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










