सांगली : संजयनगर येथील अष्टसिद्धी हनुमान मंदिराच्या भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून हा सोहळा 14 ते 20 डिसेंबर 2025 या कालावधीत पार पडणार आहे. श्री हनुमानाच्या कृपेने आणि भक्तांच्या सहकार्याने हा धार्मिक-सांस्कृतिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.
सोहळ्याच्या कालावधीत शांतिपाठ, वास्तुशांती, हवन, शोभायात्रा, मूर्ती प्राणप्रतिष्ठा, हरिकीर्तन, प्रवचन तसेच महाप्रसाद व भक्तिमय सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण सप्ताहभर मंदिर परिसर भक्तिरसात न्हालेला असणार आहे.
या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात विविध संत-महंत, कीर्तनकार आणि मान्यवर उपस्थित राहणार असून भाविकांसाठी विशेष धार्मिक कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. आयोजकांकडून सर्व भाविकांनी कुटुंबासह उपस्थित राहून या ऐतिहासिक सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अष्टसिद्धी हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून भक्ती, श्रद्धा आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
हेही वाचा: लाडकी बहीण योजनेत e-KYC दुरुस्तीसाठी मिळणार एकच संधी.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










