सांगली : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जाज्वल्य, लोककल्याणकारी आणि प्रेरणादायी कार्याची आठवण जपणारा भव्य अश्वारूढ पुतळा सांगली शहरात उभारण्यात आला असून, या पुतळ्याचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.
सांगलीकरांच्या भावनांचा आदर ठेवत जिल्हा नियोजन निधीतून उभारण्यात आलेला हा पुतळा नव्या पिढीला इतिहासातून प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. हा सोहळा सांगलीसाठी ऐतिहासिक ठरला.
या लोकार्पण कार्यक्रमाला सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी अशोक काकडे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, खासदार विशाल पाटील, माजी मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्यासह विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि पुतळा समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या न्यायप्रिय कारभाराची, समाजसुधारणेची आणि लोकहिताच्या कार्याची परंपरा जपणारा हा पुतळा सांगली शहराच्या वैभवात भर घालणारा ठरेल, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
हेही वाचा: काळ्या खणीत आढळला सांगलीतील बेपत्ता युवकाचा मृतदेह.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










