तासगाव : बलगवडे परिसरात प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा रोष उफाळून आला आहे. रविवारी भिवघाट-तासगाव मार्गावरील बलगवडे फाट्यावर ग्रामस्थांनी शेळ्या-मेंढ्यांसह रास्ता रोको आंदोलन करत आपला निषेध नोंदवला. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, प्रकल्पासाठी गट क्रमांक १८० व १८२ मधील गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू आहे. या ठिकाणी पूर्वी बिहार पॅटर्न अंतर्गत सुमारे १५ हजार झाडे लावण्यात आली होती. त्यासाठी तब्बल दहा लाख रुपयांचा खर्च करण्यात आला होता. मात्र आता ही झाडे तोडली जात असल्याने पर्यावरणीय संतुलन बिघडण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
आंदोलनकर्त्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत सांगितले की, चुकीच्या पंचनाम्यांच्या आधारे सौर प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली असून ग्रामसभेचे ठराव डावलण्यात आले आहेत. ग्रामस्थांची मते ऐकून न घेता काम सुरू केल्याने संताप वाढल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ऑक्टोबर २०२५ मध्ये प्रकल्प कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी ग्रामस्थांची वादावादी झाल्याचीही आठवण करून देण्यात आली. त्या वेळी शिवीगाळ व दमदाटी केल्याचे आरोप झाले होते. आता हा प्रकल्प पूर्णपणे रद्द झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
९ डिसेंबरपासून या सौर प्रकल्पाविरोधात विविध स्वरूपाची आंदोलने सुरू असून, १२ डिसेंबरला गाव बंद तर १४ डिसेंबरला रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. १५ डिसेंबरपासून कार्य बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य किसान सभा आणि महिला आघाडीने या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे.
हेही वाचा: नवीन मीटरनंतर वीजबिल दुप्पट? सांगलीत नागरिकांमध्ये संताप.
- बंगळुरू-मुंबई स्लीपर वंदे भारतवरून नवा वाद; सांगली-बेळगावला डावलले जाणार?
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक










