Sangli News | सांगली : काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीवरून सुरू असलेल्या अंतर्गत वादात आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ची थेट एन्ट्री झाल्याने सांगलीच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांनी काँग्रेस नेते मंगेश चव्हाण यांची भेट घेतल्याने या घडामोडीकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.
जयंत पाटील आणि मंगेश चव्हाण यांच्यात सुमारे तासभर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. काँग्रेसमध्ये शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी मंगेश चव्हाण आणि राजेश नाईक ही दोन नावे चर्चेत असताना, चव्हाण यांना डावलून नाईक यांच्या नावाचे पत्र दिल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे चव्हाण समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर मंगेश चव्हाण वेगळी राजकीय भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. यापूर्वी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनीही चव्हाण यांच्याशी चर्चा केल्याचे समोर आले होते. त्यानंतर थेट जयंत पाटील यांची भेट झाल्याने आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महापालिका निवडणूक तोंडावर असताना काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद आणि त्यात राष्ट्रवादीचा हस्तक्षेप हे संकेत आगामी राजकीय घडामोडींसाठी महत्त्वाचे मानले जात आहेत. या भेटीमागील नेमकी रणनीती काय, याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी सांगलीच्या राजकारणात हालचालींना वेग आल्याचे स्पष्ट दिसत आहे.
हेही वाचा: ९० कोटींच्या निधीत सांगलीला डावलले? कोल्हापूरसह पाच महापालिकांना लाभ, सांगलीच्या पदरात शून्य.
- वाळवा तालुक्यात भीषण अपघात; पुलावर दुचाकी आदळून युवकाचा मृत्यू, मित्र गंभीर जखमी
- इराण-इस्रायल तणावामुळे तेल दर वाढणार? सांगलीत पेट्रोल 104.07 रुपये; सध्या दरवाढ नाही
- विटा-कराड मार्गावर भीषण अपघात; जखमी महिलेचा 10 दिवसांनी मृत्यू
- सांगली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीची निवड 13 मार्चला; इच्छुकांकडून मोर्चेबांधणी
- सांगलीत कृष्णा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर; ‘हजारो मासे मृत, 5 लाख नागरिकांच्या आरोग्यास धोका’
- कवठेमहांकाळमध्ये 2.88 किलो गांजा जप्त; तस्कर अटकेत









