Sangli News | सांगली : आगामी सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणुकीत महायुती एकत्रितपणे मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी महायुतीतील समन्वयावर भर देत, भाजपचा महापौर होणे निश्चित असल्याचा दावा केला.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महायुती म्हणूनच निवडणूक लढवण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे. “शिवसेना–भाजप युती हा महायुतीचा मूलभूत आधार आहे. स्थानिक पातळीवर समन्वय साधून निवडणूक लढवली जाईल,” असे त्यांनी नमूद केले.
यावेळी काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले की, संघटनात्मक निर्णयांमध्ये काँग्रेसकडून सातत्याने विलंब होत आहे. “राष्ट्रीय अध्यक्ष असो किंवा शहर जिल्हाध्यक्ष, काँग्रेसला निर्णय घ्यायला अनेक महिने लागतात,” अशी टिप्पणी त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही सध्या अंतर्गत घडामोडी सुरू असल्याचे सूचित करत, “त्यांना त्यांचे निर्णय ठरवू द्या,” असेही पाटील म्हणाले.
महापौरपदाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “भाजपचाच महापौर होईल, हा आमचा ठाम विश्वास आहे.” काही घटकांकडून समाजात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत, विकासाच्या मुद्द्यांवरच मतदार अंतिम निर्णय घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेला आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, निवडणूक प्रमुख शेखर इनामदार, निवडणूक प्रभारी मकरंद देशपांडे, भाजप नेते पृथ्वीराज पाटील आणि जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग उपस्थित होते.
महानगरपालिका निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर महायुतीकडून संघटनात्मक तयारीला वेग आला असून, येत्या काळात जागावाटप व उमेदवार निवडीबाबत निर्णय अपेक्षित आहेत.
हेही वाचा: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा मोठा निर्णय; थकीत कर्जदारांना व्याज सवलत व एकरकमी परतफेडीची संधी.
- Gold Rate Today: दिवाळी खरेदीत सोन धडाम; २२K आणि २४K चे भाव किती उतरले? पाहा पीएनजीचे आजचे ताजे दर
- FASTag Local Pass: टोल नाक्यावर रांगेत थांबण्याचा मनस्ताप संपला! ‘राजमार्गयात्रा’ ॲपवरून घरबसल्या कसा काढायचा लोकल पास? जाणून घ्या नियम
- Nagpur Goa Shaktipeeth Expressway: नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीला सांगली, कोल्हापुरात पुन्हा वेग; कोणत्या जिल्ह्यातून किती किमी जाणार? पाहा सविस्तर आकडेवारी
- Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण; २८ ऑक्टोबरनंतर भाव आणखी कोसळणार की तेजी येणार? खरेदीपूर्वी पाहा पीएनजीचे आजचे दर (२५ ऑक्टोबर २०२६)
- Ladki Bahin Yojana: दिवाळी सणासाठी लाडक्या बहिणींना मोठा दिलासा? खात्यात १५०० जमा होणार की ३०००? पाहा नेमकी स्थिती
- Maharashtra Weather: राज्यात धो-धो पाऊस? २७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान हवामानात मोठा उलटफेर; उकाड्यात पावसाची चाहूल









